Toy Library

टॉय लायब्ररी

Toy Library A toy library in a school is a special room where children can play with different educational toys, puzzles, blocks, board games, and learning materials. It helps students develop creativity, problem-solving skills, social interaction, and imagination through fun activities. It provides a joyful learning environment where children learn while playing.

टॉय लायब्ररी शाळेतील खेळणी ग्रंथालय ही एक विशेष खोली असते, जिथे मुलांना विविध शैक्षणिक खेळणी, कोडी, ब्लॉक्स, बोर्ड गेम्स आणि शिकण्यासाठी लागणारे साहित्य यांच्याशी खेळता येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता, सामाजिक संवाद कौशल्ये आणि कल्पनाशक्ती विकसित होते. मजेदार उपक्रमांद्वारे मुले खेळता खेळता शिकतात आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण निर्माण होते.


Audio- Visual Room

दृक-श्राव्य कक्ष

Audio- Visual Room The college has a well-equipped Audio-Visual (AV) room that plays a vital role in enhancing the teaching-learning process. It provides digital support to make concepts easy to understand and more engaging for students. Through visual presentations, videos, and interactive tools, abstract and complex topics become clearer and more interesting. The AV room makes learning more interactive, improves student participation, and helps in better retention of knowledge. It is an essential facility that bridges traditional teaching with modern digital methods

दृक-श्राव्य कक्ष विद्यालयात सुसज्ज दृकश्राव्य कक्ष उपलब्ध आहे. या कक्षामध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने संकल्पना सोप्या आणि अधिक आकर्षक पद्धतीने समजावून सांगता येतात. दृश्य सादरीकरणे, व्हिडिओ यांच्या माध्यमातून अवघड व गुंतागुंतीच्या संकल्पना अधिक स्पष्ट आणि रंजक बनतात. दृकश्राव्य कक्षामुळे शिक्षण अधिक परस्परसंवादी होते, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो आणि ज्ञानाची दीर्घकालीन स्मरणशक्ती सुधारते. पारंपारिक अध्यापन पद्धती आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान यांच्यामध्ये दुवा साधणारी ही एक महत्त्वपूर्ण सुविधा आहे.


Library

सुसज्ज ग्रंथालय

Library The college Library is well-equipped and student- friendly. It has a good collection of textbooks, reference books, and magazines. Students get calm and comfortable place for reading and study. Newspapers and competitive exam materials are also available. It plays an important role in developing reading habits and knowledge among students.

ग्रंथालय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अनुकूल व आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज असे ग्रंथालय आहे . येथे पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि मासिकांचा चांगला संग्रह आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत व सकारात्मक वातावरण मिळते. वृत्तपत्रे आणि स्पर्धा परीक्षांसाठी साहित्यही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व ज्ञानवृद्धी घडवण्यात ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका आहे.


Computer Lab

संगणक कक्ष

Computer Lab A computer lab for college is a dedicated room equipped with multiple computers and related technology resources for students to perform academic tasks, practical experiments, research, programming, and project work. It provides a structured environment where students can access software, internet facilities, and technical tools needed for their courses. They help students gain practical knowledge, improve technical skills, and complete assignments efficiently. A well-maintained computer lab is an essential part of modern college education.

संगणक कक्ष संगणक प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम , प्रात्यक्षिके, संशोधन, प्रोग्रामिंग आणि प्रकल्प कार्य करण्यासाठी ,अनेक संगणक व संबंधित तांत्रिक साधनांनी सुसज्ज असा स्वतंत्र कक्ष आहे. येथे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर, इंटरनेट सुविधा आणि तांत्रिक साधने सहज उपलब्ध होतात. संगणक प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळते, तांत्रिक कौशल्ये विकसित होतात आणि प्रकल्प अधिक कार्यक्षमतेने व जलदगतीने पूर्ण करता येतात. सुसज्ज असलेली संगणक प्रयोगशाळा ही आधुनिक विद्यालयीन शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.


Naadbrahma Room

नादब्रह्म कक्ष

Naadbrahma Room The Naadbrahma Room is a well-equipped and inspiring space dedicated to music education in the school. It provides students with both theoretical and practical knowledge of music. The room is furnished with a variety of musical instruments such as tabla, harmonium, keyboard, dholak, flute, etc. giving students ample opportunity for hands-on practice. The room is also equipped with a sound system and recording facilities, enabling students to enhance their singing and instrumental performances. Special guidance is provided in this room for Gandharva Mahavidyalaya examinations, helping students prepare effectively. Regular practice sessions, along with training in rhythm and melody, contribute to the development of students’ musical skills. Overall, the Naadbrahma Room plays a vital role in nurturing students’ talents, boosting their confidence, and fostering a deep interest in music.

नादब्रह्म कक्ष नादब्रह्म कक्ष हा शाळेतील संगीत शिक्षणासाठी सुसज्ज व प्रेरणादायी कक्ष आहे. येथे विद्यार्थ्यांना संगीताचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. कक्षामध्ये तबला, हार्मोनियम, कीबोर्ड, ढोलक, बासरी इत्यादी विविध वाद्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सरावाची संधी मिळते. या कक्षात ध्वनिक्षेपक (Sound System) व रेकॉर्डिंगची सुविधा असल्याने विद्यार्थ्यांचे गायन व वादन अधिक प्रभावीपणे सादर करता येते. नादब्रह्म कक्षात गंधर्व महाविदयालय परीक्षा (Gandharva Exams) तयारीसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते. नियमित सराव, ताल-लय यांचा अभ्यास आणि गायन-वादन कौशल्यांचा विकास यासाठी हा कक्ष उपयुक्त ठरतो. एकूणच, नादब्रह्म कक्ष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि संगीताविषयीची आवड निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे.


Music Room

संगीत कक्ष

Music Room The school has a well-equipped music room that nurtures students’ interest in music and performing arts. It is furnished with a variety of musical instruments, allowing students to explore both vocal and instrumental music. The room provides a creative and engaging environment where students learn basic to advanced musical skills. Regular practice sessions help in developing rhythm, coordination, and confidence. Overall, the music room plays an important role in enhancing students’ artistic abilities and holistic development.

संगीत कक्ष शाळेत सुसज्ज संगीत कक्ष उपलब्ध आहे, जो विद्यार्थ्यांच्या संगीत व कलात्मक आवडीला प्रोत्साहन देतो. या कक्षात विविध वाद्ये उपलब्ध असून विद्यार्थ्यांना गायन व वाद्यसंगीत दोन्ही शिकण्याची संधी मिळते. हा कक्ष सर्जनशील आणि आनंददायी वातावरण निर्माण करतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत ते प्रगत संगीत कौशल्ये आत्मसात करता येतात. नियमित सरावामुळे त्यांच्यात ताल, समन्वय आणि आत्मविश्वास वाढतो. एकूणच, संगीत कक्षाची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका आहे.


Mathematics Lab(College)

गणित प्रयोगशाळा(कनिष्ठ महाविद्यालय)

गणित कक्ष :--- आमच्या महात्मा गांधी विद्यालयात, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कै. भरत करमरकर स्मृतिप्रत्यर्थ श्री पी.के. चौधरी गणित कक्षाची स्थापना सन 2021-22 मध्ये करण्यात आली. या गणित कक्षासाठी सन 1977 च्या दहावीच्या बॅचने भरघोस अर्थसाहाय्य केले आहे. सदर गणित कक्षात इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी गणिताच्या तासिकेला उत्स्फूर्तपणे गणित प्रात्यक्षिकात सहभागी होतात. सदर गणित कक्षाचा उपयोग विद्यार्थ्यांची गणितातील आवड, रुची वाढविण्यासाठी होतो. या कक्षात शेकडो गणित उपकरणे ठेवली असून सदर उपकरणांचा दैनंदिन अभ्यासक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करता येतो. त्यामुळे निश्चित विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होण्यास मदत होते. तसेच गणितातील संबोध, संकल्पना समजण्यास देखील मदत होते. या सर्वांचा परिपाक म्हणजे विद्यार्थ्यांची तार्किक बुद्धी वाढीस मदत होत आहे. तसेच अप्रत्यक्षपणे शाळेची गुणवत्ता वाढण्यास देखील मदत होते.

गणित कक्ष :--- आमच्या महात्मा गांधी विद्यालयात, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कै. भरत करमरकर स्मृतिप्रत्यर्थ श्री पी.के. चौधरी गणित कक्षाची स्थापना सन 2021-22 मध्ये करण्यात आली. या गणित कक्षासाठी सन 1977 च्या दहावीच्या बॅचने भरघोस अर्थसाहाय्य केले आहे. सदर गणित कक्षात इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी गणिताच्या तासिकेला उत्स्फूर्तपणे गणित प्रात्यक्षिकात सहभागी होतात. सदर गणित कक्षाचा उपयोग विद्यार्थ्यांची गणितातील आवड, रुची वाढविण्यासाठी होतो. या कक्षात शेकडो गणित उपकरणे ठेवली असून सदर उपकरणांचा दैनंदिन अभ्यासक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करता येतो. त्यामुळे निश्चित विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होण्यास मदत होते. तसेच गणितातील संबोध, संकल्पना समजण्यास देखील मदत होते. या सर्वांचा परिपाक म्हणजे विद्यार्थ्यांची तार्किक बुद्धी वाढीस मदत होत आहे. तसेच अप्रत्यक्षपणे शाळेची गुणवत्ता वाढण्यास देखील मदत होते.