महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ (प)
दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ या संस्थेने सन २०२६ मध्ये ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशा नामांकित संस्थेला जेव्हा ९० वर्षे पूर्ण होतात तेव्हा ती घटना केवळ संस्थेसाठीच नाही तर संपूर्ण शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. कारण एखाद्या संस्थेचा ९ दशकांचा प्रवास म्हणजे या दीर्घ कालखंडातील समाजाच्या पर्यायाने शहराच्या जडणघडणीचा चालता बोलता ज्वलंत इतिहास असतो. तसेच तो वर्तमानातील ध्यास तर भविष्यातला विश्वासही असतो. गेली ९० वर्ष दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ ही संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. आपल्यापाशी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने घडवत आणि संपन्न करीत, ही ज्ञान सरिता अखंड वाहत आहे. तिचे पात्र दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष अधिक विस्तीर्ण आणि सखोल होत आहे. या शुभंकर प्रवाहाचा उगम अंबरनाथ नगरीत झाला ते वर्ष होते - सन १९३६ आणि ज्यांच्या द्रष्टेपणामुळे ही ज्ञानगंगा वाहती झाली; ती व्यक्ती होती ऋषितुल्य कैलासवासी पुरुषोत्तम वासुदेव तथा भाऊसाहेब परांजपे! सन १९२२ मध्ये विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले भाऊसाहेब नोकरीनिमित्त अंबरनाथ शहरात वास्तव्यास आले. इथल्या धरमजी मोरारजी केमिकल कंपनीत ते मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्या काळात कोहोजगाव- खूंटवली या परिसरात लोकल बोर्डाची इ. ४ थी पर्यंत एकच शाळा होती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी कल्याणला जावं लागे. त्याकाळी शाळकरी मुलांसाठी ते सोपे नव्हतं. कारण अंबरनाथला तेव्हा रेल्वेचा प्लॅटफॉर्मही नव्हता. शिडीच्या सहाय्याने लोकलचा डबा चढावे/ उतरावे लागत असे. रोजची अशी कसरत पार पाडत शिक्षणासाठी कल्याणला जायचं किंवा शिक्षण अर्धवट सोडायचं एवढा एकमेव पर्याय! शिक्षणाबद्दल मनस्वी आस्था असलेल्या भाऊसाहेबांना ही परिस्थिती अस्वस्थ करीत होती. परंतु त्यांची ही तळमळ केवळ भावनिक नव्हे तर चिंतनशील आणि कृतीशील होती. ही परिस्थिती पालटण्यासाठी काय करता येईल? याचं चिंतन त्यांनी केलं आणि याचच दृश्य फलित म्हणजे - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ. सन १९३६ मध्ये भाऊसाहेबांनी आपल्या समविचारी मित्रांसमवेत संस्थेची स्थापना केली आणि अंबरनाथच्या शैक्षणिक प्रगतीचा एक नवा अध्याय सुरु झाला. संस्थेच्या माध्यमातून सन १९३६ साली संस्थापक भाऊसाहेब परांजपे, अध्यक्ष डॉ. बी. जे. छाया आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या पुढाकाराने, अंबरनाथ शहरात २२ विद्यार्थ्यांच्या सहवासातून पहिले माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. डी.एम.सी. कंपनीने भाऊसाहेबांना दिलेल्या प्रशस्त बंगल्यात ही शाळा भरु लागली. आणि शाळेचे नाव ठरले - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे, न्यू इंग्लिश स्कूल. महात्मा गांधीजींच्या अंबरनाथ नगरीतील वास्तव्याची आठवण म्हणून याच शाळेचे पुढे जाऊन महात्मा गांधी विद्यालय असा नामविस्तार करण्यात आला.
आमचे संस्थापक
Founder
दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे संस्थापक :-- कै. पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे "समाजाय इदम ! न मम!!" या तत्वाने आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी अर्पण करणारे, थोर स्वातंत्र्य सैनिक, अंबरनाथचे पहिले आमदार, द्रष्टे नेते, सामाजिक कार्यकर्ते, कामगारांचे कैवारी आणि अंबरनाथ शहराच्या सामाजिक, दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथच्या माध्यमातून शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे. प्रथमतः त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!! भाऊसाहेब परांजपे यांचा जन्म १३ मार्च १८९५ या दिवशी सातारा येथे झाला. परांजपे घराणे मूळचे कोकणातील अडीवऱ्याचे. भाऊसाहेब कोकणातून सासवड जवळील परिचे येथे आले. त्यामुळे परिचेकर परांजपे म्हणूनही त्यांना ओळखत असत. भाऊसाहेबांचे लहानपण परीचे आणि सातारा येथे गेले. १९२२ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. अंबरनाथ येथील धरमसी मोरारजी केमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून भाऊसाहेब नोकरीला लागले. त्यांच्या कामाची दखल घेऊन कंपनीकडून त्यांना काही वर्षांसाठी इंग्लंडला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिथून परतल्यानंतर कंपनीच्या मुख्य कार्यालयात त्यांनी काही काळ कंपनी सचिव म्हणूनही काम केले. १९५७ मध्ये अंबरनाथ येथून व्यवस्थापक पदावरून ते निवृत्त झाले. १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत ते सहभागी झाले होते. त्यांनी दोनदा कारावासही भोगला. भाऊसाहेब परांजपे यांनी मुंबई प्रांताचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्या अर्थाने भाऊसाहेब परांजपे हे खऱ्या अर्थाने अंबरनाथचे पहिले आमदार होते.अंबरनाथ येथे अनेक लहान मोठ्या कंपन्यामध्ये नोकरीसाठी अंबरनाथ शहराच्या बाहेरून हजारो कामगार स्थायिक झाले होते. त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी भाऊसाहेब परांजपे यांनी सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा करून अंबरनाथ शहरातील पूर्वेकडे बाजार भावाने जमीन विकत घेतली. या जमिनीचे व्यवस्थित नियोजन भाऊसाहेब परांजपे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने केले. भूभागाचे नियोजन, इतक्या मोठ्या वसाहतीसाठी लागणाऱ्या अन्य सोयी सुविधांसाठी भूभागाच्या व्यतिरिक्त जमीन आरक्षित करण्यात आली. रस्ते, विविध कार्यालयांसाठी, खेळाच्या मैदानासाठी, मनोरंजन केंद्रासाठी अशी विविध प्रयोजनांसाठी आरक्षण करण्यात आले. ६३० पेक्षा अधिक भूभाग असलेली महाराष्ट्रातील किंबहुना आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जुनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. हजारो कुटुंबांच्या निवासाची सोय झाली. निवासासह या कामगार, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही सोय व्हावी, यासाठी सन १९३६ मध्ये दि एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना करून महात्मा गांधी विद्यालय सुरू केले. या शाळेसाठी साठी त्यांना डॉ. भुजंगीलाल गौरीशंकर छाया अर्थात डॉ.बी. जी छाया यांचीही मोलाची मदत झाली. भाऊसाहेब परांजपे हे धरमसी मोरारजी केमिकल कंपनीत नोकरी करीत तर डॉ. भुजंगीलाल गौरीशंकर उर्फ बी. जी. छाया हे प्रसिद्ध विमको कंपनीमध्ये मुख्य वैधकीय अधिकारी म्हणून नोकरीला होते. त्या काळात महात्मा गांधी विद्यालय ही शाळा खाजगी जागेतील खोल्यांमध्ये भरायची. दि एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यलयांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर यशस्वी रीत्या जीवन जगत आहेत. भाऊसाहेब परांजपे यांनी ठाणे जिल्हा विकास मंडळ, केंद्र सरकारने अन्नधान्य समस्यांचा विचार करण्यासाठी नेमलेली समिती, मुंबई प्रांताची जंगल विभाग विकास योजना समिती यांवरही काम केले. भाऊसाहेब परांजपे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या अंबरनाथ ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. भाऊसाहेब परांजपे यांनी 'सूर्योदय' हे साप्ताहिकही सुमारे चार वर्षे चालविले. त्याकाळात असलेल्या मुंबई प्रांताचे आमदार असल्याने भाऊसाहेब परांजपे यांची राजकीय वर्तुळात उठबस होती. १९५० मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना काही वेळ भाऊसाहेबांच्या घरी थांबले होते. पं जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आदी मान्यवरही अंबरनाथला भाऊसाहेब परांजपे यांच्या घरी येऊन गेले होते. भाऊसाहेब परांजपे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अंबरनाथकरांनी भाऊसाहेबांना दिलेली मानधनाची थैली त्याच समारंभात त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या दि एज्युकेशन सोसायटीला दिली होती. प्राचीन शिवमंदिराजवळ भाऊसाहेब परांजपे यांना धरमसी मोरारजी केमिकल कंपनीने निवासासाठी जागा घेऊन दिली होती. आजही त्या विभागाला परांजपे चाळ असे संबोधले जाते. भाऊसाहेबांनी अनेक कामगारांना अतिशय माफक दरात घरे घेऊन दिली होते.भाऊसाहेब परांजपे यांनी कधीही स्वार्थ जोपासला नाही.आयुष्याच्या अखेरपर्यंत भाऊसाहेब परांजपे कार्यरत होते. भाऊसाहेब परांजपे यांनी सूर्योदय सोसायटीची स्थापना केली. या सूर्योदय सोसायटीने, भाऊसाहेबांनीच स्थापन केलेल्या दि एज्युकेशन सोसायटीच्या कानसई येथे सुरू करण्यात आलेल्या शाळेला भाऊसाहेब परांजपे यांचे नाव देण्यासाठी भरीव आर्थिक देणगी दिल्यावर त्या शाळेला "भाऊसाहेब परांजपे विद्यालय" असे नांव देण्यात आले आहे. सूर्योदय सोसायटीचे संस्थापक या नात्याने साई विभागात असलेल्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर भाऊसाहेब परांजपे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. अंबरनाथ शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या भाऊसाहेब परांजपे यांचे 30 जून 1981 रोजी निधन झाले. भाऊसाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!!
महात्मा गांधी विद्यालय
Data Pending
Our Vision
उद्दिष्टे
Data Pending
Our Values
मूल्य
Data Pending
Our Mission
ध्येय
Data Pending
Future Plan
भविष्यकालीन योजना
प्रसन्न व आनंदी वातावरणाला पोषक अशी सुसज्ज इमारत.
शाळेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरणे हे काळानुसार क्रमप्राप्त आहे. त्यासाठीच शाळेचा भौतिक व शैक्षणिक सोयी सुविधांनी विकास करणे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध भाषांमधून शिक्षण देणे, व्यावसायिक कौशल्याचा विकास करणे व स्पर्धा परीक्षेसाठी तज्ञांचे मार्गदर्शन देणे
शारीरिक विकास साधण्यासाठी क्रीडा व कला अकॅडमी व मुलींसाठी N.C.C व क्रिकेट सुरू करणे.आधुनिक अद्ययावत व्यायाम शाळा सुरू करणे.
शिक्षक ,पालक व विद्यार्थी यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी शाळेतच विद्यार्थी व पालक समुपदेशन केंद्र सुरू करणे.
Message
संदेश
डॉ. श्री. उल्हास कोल्हटकर (अध्यक्ष)
Data To Be Change
श्रीमती. लोहार जे. एम. (मुख्याध्यापिका)
Data To be Change
सौ समता ज.पावसकर (मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग)
Data To Be Change
TESA Management Committee
व्यवस्थापन समिती
Dr. Ajit Anil Godbole
डॉ. अजित अनिल गोडबोले
President
अध्यक्ष
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Ashok Kulkarni
श्री. अशोक कुलकर्णी
Vice President
उपाध्यक्ष
Data Awaiting
Data Awaiting
Sudheendra Shurpali
सुधींद्र शुर्पाळी
Secretary
सचिव
Data Awaiting.
Data Awaiting.
Mr. Dilip Sathe
श्री. दिलीप साठे
Joint Secretary
सह सचिव
Data Awaiting
Data Awaiting
Pankaj Bhalerao
पंकज भालेराव
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Dipak Chavan
श्री. दीपक चव्हाण
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Gopal Damle
गोपाल दमले
Member
सदस्य
Data Awaiting.
Data Awaiting.
Mr. Prasad Joshi
श्री. प्रसाद जोशी
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Dilip Kanase
दिलीप कानसे
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Mrs. Varsha Prabhudesai
श्रीमती वर्षा प्रभुदेसाई
Member
सदस्य
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Shailesh Raikar
श्री शैलेश रायकर
Member
सदस्य
Data Awaiting.
Data Awaiting.
Trustees
विश्वस्त
Mr. Bhagwan Chakradev
श्री भगवान चक्रदेव
Cheif Trustee
मुख्य विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting
Mr.Balkrushna Kamble
श्री. बाळकृष्ण कांबळे
Trustee
विश्वस्त
Data Awaiting.
Data Awaiting.
Data Awaiting.
Data Awaiting.
Mrs. Dipali Aakhare
श्रीमती दीपाली आखरे
Trustee
विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Manik Patil
श्री. मणिक पाटील
Trustee
विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting
Mr. Abhay Puntambekar
श्री अभय पंटांबेकर
Trustee
विश्वस्त
Data Awaiting
Data Awaiting